मोठी बातमी! दिल्लीतील दोन सरकारी हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याचा ई-मेल

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीमध्ये दोन(big news) सरकारी हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासंबंधी ई-मेल मिळाला आहे. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

बुरारी सरकारी हॉस्पिटल आणि मंगोलपुरीमधील संजय गांधी हॉस्पिटलला (big news) बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अनेक पब्लिक स्कूल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज दोन हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सर्च ऑपरेसन युद्ध पातळीवर सुरु आहे.

काही मिडिया रिपोर्टनुसार, बॉम्बने उडवून देण्याची धमकी हॉस्पिटलच्या ई-मेल आयडीवर आली होती. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने याची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत बॉम्ब स्कॉड, आपात्कालीन विभागाचे कर्मचारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. हॉस्पिटलच्या सर्व परिसराची तपासणी सुरु झाली आहे.

डीसीपी मनोज मीणा म्हणाले की, माहिती मिळतात बॉम्ब स्कॉड घेऊन अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. आतापर्यंत काहीही संशयास्पद सापडलेलं नाही. पोलिसांना दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी ही माहिती मिळाली होती. पहिला फोन बुराडी हॉस्पिटलमधून आला होता. त्यानंतर दुसरा फोन ४ वाजून २६ मिनिटांनी संजय गांधी हॉस्पिटलमधून आला. सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे.

हेही वाचा :

ह्रदयद्रावक! उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन

संजयकाका पाटील की विशाल पाटील? नेमका कौल कोणाला? सांगली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावली चक्क दुचाकींची पैज!

चाहत्यांना विनंती आहे की सामन्यानंतर… राजस्थानच्या मॅचनंतर धोनी निवृत्ती घेणार?