सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता रोहिराचा भीषण अपघात(accident) झाला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर झाला असून ओठांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या भीषण अपघाताचे फोटो पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

पुलकित सम्राटची एक्स पत्नी अभिनेत्री श्वेता रोहिराचा हा भीषण अपघात(accident) झाला आहे. अभिनेत्रीचे रुग्णालयातील फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामधून अभिनेत्री थोडक्यात बचावली असल्याचे दिसत आहे. श्वेताने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत या अपघाताविषयी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
श्वेताने लिहिले, “आयुष्य आश्चर्याने भरलेले असते. एका क्षणी आपण ‘कल हो ना हो’ मधील गाणे गुणगुणत असतो तर दुसऱ्याच क्षणाला आपल्या दिवसाची व्यवस्थित आखणी करत असतो. माझी काही चूक नसताना मी स्वतःला एका गाडीला धडकताना आणि हवेत उडून खाली पडताना पाहिले.”

श्वेता पुढे म्हणाली, “मोडलेले हाड , जखमेचे निशाण आणि अंथरुणावर घालवलेले शेवटचे काही तास, हे माझ्या यादीत नव्हते. पण विश्वाला वाटले की मला अजून धैर्याची गरज आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला तोडते कारण आपल्याला पुन्हा मजबूत बनवायचे असते.”
श्वेताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. या अपघातातून श्वेता सुखरूप बचावली असली तरी, तिला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा :
‘शिवाजी महाराज लाच देऊन सुटले…’; मराठी अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
परीक्षा केंद्रांबाबत मोठा निर्णय; शिक्षण मंडळाने उचललं मोठं पाऊल
लहानपणीचं प्रेम आठवलं, इन्स्टावर एक्स गर्लफ्रेंडला रिक्वेस्ट पाठवली; नव्या बॉयफ्रेंडचा पारा चढला, अन्…