दीपिकाच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

बाॅलिवूडमधील(entertainment news) सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही सतत चर्चेत असतात. काही दिवासांपूर्वी दीपिका आणि रणवीरने आई बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. सप्टेंबरमध्ये चाहत्यांना गुडन्यूज देणार आहे अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. दरम्यान, आज (08) स्पटेंबर रोजी बाळाला जन्म दिला आहे.

दीपिका पादुकोणने (entertainment news))चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (8 सप्टेंबर) दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी दीपिकाला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रविवारी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

आपल्या चाहत्यांसाठी दोघे सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवनवीन फोटो शेअर करत असतात. दीपिका आणि रणवीरची फॅन फॉलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी रणवीर आणि दीपिका या दोघांनी देखील अनंत- राधीकाच्या लग्नात हजेरी लावली होती.

हेही वाचा:

आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार?

खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी

पत्नी हॉस्पिटलमध्ये.. बिल भरायला पैसे नव्हते; व्यक्तीला चिमुकल्या बाळाला विकायला लावले