विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ राज्यात 15 दिवस शाळांना सुट्टी

गेल्या काही दिवसापासून देशातील उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पसरली आहे. इथल्या थंड्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी जाणवू लागली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात देशभरात थंडी असून पुढचे आणखी काही दिवस थंडी कायम राहील असा अंदाज हवामानविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेमुळे हरयाणा सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. हरयाणामधील सर्व शाळांना सुट्टी(Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर भारतात काही राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी पावसाने देखील हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वातावरण हे मोठ्या प्रमाणात थंड होत आहे. बदलत्या वातावरणाचा फटका हा नागरिकांना बसत आहे. शाळेत जाणारी लहान-लहान मुले यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. यासाठी हरयाणा सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

थंडीची आलेली लाट पाहता हरयाणा सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सुट्टी(Holiday) देण्याचा निर्णय घेतला आहे. हिवाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत हरयाणा सरकारने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. 16 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरू केली जाणार आहे. सुट्ट्याबाबत हरयाणा सरकारच्या शिक्षण विभगाने हे आदेश जारी केले आहेत. हरयाणाच्या शिक्षण मंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हिवाळ्याच्या सुट्टीत सीबीएससीई आणि आयसीएसई बोर्ड आणि अन्य शाळा 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना ठरलेल्या वेळेनुसार प्रॅक्टिकल करण्यासाठी बोलावू शकतात. राज्यातील शिक्षण विभगाशी सबंधित सर्वांना या आदेशाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच सरकारने थंडीची लाट पाहता शाळेच्या वेळेत देखील बदल केले आहेत. 10 ते 4 यावेळेत शाळा भरणार आहेत.

गुरुवारी मध्यरात्रीपासून दिल्लीत सुरू असलेला पाऊस आणि हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. शुक्रवारी कमाल तापमानात 10 अंश सेल्सिअसची घसरण झाल्याने हंगामातील सर्वात थंड दिवस ठरला. गुरुवारी मध्यरात्रीनंतर दिल्लीत विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस सुरू झाला. सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी हलका पाऊस सुरू झाला.

ऊन नसल्यामुळे कमाल तापमानात घट झाली असून कमाल तापमान 14.6 अंशांवर नोंदवण्यात आले असून ते सरासरीपेक्षा सहा अंशांनी कमी आहे. गुरुवारी कमाल तापमान 24.1 अंश इतके नोंदवले गेले. म्हणजेच 24 तासांत कमाल तापमानात सुमारे 10 अंशांची घसरण नोंदवण्यात आली. सफदरजंग येथे किमान तापमान 11 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी अधिक आहे.

सध्या सहारनपूरमधील हवामानातील बदलामुळे थंडीमुळे नागरिकांची अडचण होत आहे. दिवसभर रिमझिम पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. शुक्रवारी कमाल तापमान 19.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9.8 अंश सेल्सिअस होते. खराब हवामान आणि पावसामुळे शुक्रवारी अनेक विमानांनी दिल्ली विमानतळावरून उशिराने उड्डाण केले. दिल्लीतील विविध टर्मिनल्सवरून 165 हून अधिक उड्डाणे उशिराने झाली.

हेही वाचा :

टाटा समूह पुढील ५ वर्षात टाटा ५ लाख नोकऱ्या देणार

ठरलं तर! भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला; ‘या’ नेत्याच्या नावाची घोषणा लवकरच

फसवणूक! काल, आणि आज!