लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाचे टेन्शन(news) वाढले आहे. अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत फक्त एक जागा मिळाली. ही निवडणूक अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई होती. मात्र ही लढाई शरद पवार यांनी जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात(news)असल्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. लोकसभेत यश न आल्यामुळे विधानसभेची चिंता अजित पवार गटातील आमदांराना लागली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार का?, अशी चर्चा देखील रंगली आहे.
लोकसभेचे निकाल लागले तेव्हा अजित पवार गटाचे ५ ते ६ आमदार संपर्कात असल्याची शरद पवार गोटातून चर्चा होती. दरम्यान अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. या आमदारांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागणार, असे रोहित पवार म्हणाले.
शरद पवार यांनी अजित पवार गटातील मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार ठरवले आहेत. आज फक्त चर्चा आहे. पुढच्या १५ दिवसात काय होतं ते बघा. दादा आणि पक्षाचे नेते पुढे बसलेले असताना आमदार काय बोलणार त्यांना १५ दिवसात निर्णय घ्यावा लागले, असे रोहित पवार म्हणाले.
शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली असून ३० उमेदवार ठरले आहेत. अजित पवार गटाच्या मतदारसंघात काही उमेदवार फायनल देखील झाले. मात्र १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. यातील किती घ्यायचे हे शरद पवार आणि जयंत पाटील ठरवतील, असे रोहित पवार म्हणाले.
सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागत आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, सुप्रिया सुळे केंद्रातील नेत्या आहेत. त्यांचं मोठं काम आहे. शरद पवार दिल्लीला गेले. तेव्हा सुप्रिया सुळे देखील सोबत होत्या. एनडीएची अजून चर्चा व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात काहीही होऊ शकतं.
अजित पवार यांच्याविरोधात लढणार का असा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. मी बारामतीमधून निवडणूक लढवणार नाही. मी कर्जत-जामखेड सोडून जाणार नाही. कर्जत-जामखेडने मला ओळख दिली. संघर्ष करायला शिकवल. बारामतीमधून पवार साहेब योग्य उमेदवार देतील.
भाजप नेहमी छोट्या पक्षांना संपवतो, हे राज ठाकरे यांना कसं कळत नाही. हे मला माहिती नाही. हळूहळू त्यांना जाणवेल, मात्र तेव्हा उशीर झाला असेल आणि मनसे संपलेली असेल, असे देखील रोहित पवार म्हणाले.
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सुद्धा शरद पवार गटाचे दोन आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. आम्हाला आमच्या मतदारसंघात काम करायचे आहे, त्यामुळे अजितदादा यांच्यासोबच यायचे आहे, असे आमदरांनी सांगितल्याचे मिटकरी म्हणाले.
हेही वाचा :
शौचास बसण्याच्या कारणावरून वाद टोकाला गेला…
कांद्याला झळाळी! दरात झाली वाढ, कोणत्या बाजारात किती दर?
सुनीता विल्यम्सची अवकाश झेप यशस्वी; स्पेस डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल