मुंबई : राज्य सरकारने(Good news) राज्यातील होमगार्ड्सचा दसरा गोड केला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता याच निर्णयाच्या अमंलबजावणीला सुरुवात झाली आहे. या निर्णयाबबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून त्यांनी त्यांनी राज्यातील समस्त होमगार्ड्सना शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील होमगार्ड्सचे(Good news) मानधन दुप्पट करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्यातील होमगार्ड्सना इतर राज्यातील होमगार्ड्सच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळणार आहे. नव्या निर्णयानुसार होमगार्ड्सचे मानधन प्रतिदिवस 570 रुपयांवरून थेट 1 हजार 83 रुपये करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात एकूण 11 हजार 207 होमगार्ड्सची भरती करण्यात आली आहे. सध्या या होमगार्ड्सना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणार्थी होमगार्ड्सनाही नव्या निर्णयानुसारच मानधन मिळणार आहे. या होमगार्ड्स द दसऱ्याची एका प्रकारे भेटच मिळाली आहे. या निर्णयाचा एकूण 55 हजार होमगार्ड्सना लाभ मिळणार आहे.
होमगार्ड्ससंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ‘राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कमसुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये तर भोजन भत्ता 100 वरून 250 रुपये इतका करण्यात आला आहे,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.
तसेच, राज्यातील सुमारे 55,000 होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. 1 ऑक्टोबर 2024 पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे 11,207 होमगार्ड्सची भरती प्रक्रियासुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सध्या त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 12, 2024
आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे.
याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता 100 वरून 200 रुपये… pic.twitter.com/iIUFmzskeI
दरम्यान, राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या वर्गांना आकर्षित करण्याठी सरकारने इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
हेही वाचा:
” र” आणि “ड” ने उडवला गोंधळ
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम ठोकणार? क्रिकेटविश्वात खळबळ
पूजेमध्ये आंब्याचे, विड्याचे पान; दसऱ्याला आपट्याच्या पानाला का मान?