मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादाय बातमी समोर येत आहे. विधानसभेच्या(political articles) निकालानंतर महायुतीला घवघवीत यश तर मिळालं, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी नाराज आहेत.

त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद(political articles) मिळाल्यास मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वापर्यंत पोहचवला असल्याची बातमी समोर आली आहे. पण याबाबत अद्याप दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महायुतीत सामील असलेल्या एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

हेही वाचा :

ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार? ‘या’ मतदारसंघामध्ये होणार फेर मतमोजणी

6 मजली इमारतीला भीषण आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

पुरे झाली चर्चा… भाजपाची CM पदासंदर्भात कठोर भूमिका; शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं