संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड (news)याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघं सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसंच, संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे.

त्याचबरोबर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे(news). दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली. नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन गटातले दोन्ही आरोपी आमनेसामने यापूर्वी आले होते. दादा खिंडकर या मारहाणीतील आरोपीनेही अशाच प्रकारचा आरोप केला होता.
हेही वाचा :
‘मी माझ्या नवऱ्यामुळे…’; चित्रा वाघ यांचा पहिल्यांदाच मोठा खुलासा
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार…!, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य
मलायका अरोराचा खरंच RR ला पाठिंबा की काहीतरी ‘स्पेशल’? ‘या’ खेळाडूमुळे चर्चेत