मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर विमानतळावर (airport) एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी देखील केली आहे.

सुषमा अंधारे या नागपूर येथे गेल्या होत्या. आज पहाटे त्या तिथून मुंबईसाठी निघाल्या होत्या. त्याच क्षणी विमानतळावर(airport) एक 6 फूट उंचीचा गंध लावलेला व्यक्ती त्यांच्यासमोर आला.या व्यक्तीने सुषमा अंधारे यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्या माणसाने जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

परभणी प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालु आहे. अशातच आत्ता 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर departure gate ला विचित्र घटना घडली. मी, माझी 7 वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या ऍड. स्मिता कांबळे यांच्या समवेत होते.

साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणुन वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेट वरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीराम च्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला.

देवेंद्र जी , आपण आपल्या यंत्रणेकडून या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती तपासावी. हा घटनाक्रम इथे लिहू नये असे खुपदा वाटले. मात्र दहशत आणि दबावतंत्राचे हे गलिच्छ राजकरण मुख्यमंत्री म्हणुन आपल्यापर्यंत पोचवणे ही नागरिक म्हणुन माझी जबाबदारी आहे असे वाटले. टीप : शासनाने मला सुरक्षा पुरवावी असे अजिबात वाटत नाही. कारण त्यावर माझा फारसा विश्वास नाही. बाकी आपली मर्जी, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. ही पोस्ट आता तूफान व्हायरल झाली.

हेही वाचा :

आज 12 पैकी कोणत्या राशीला मिळणार धन व समृद्धी

‘पंजाब’ चुकीचे लिहिल्यामुळे दिलजीत दोसांझ ट्रोल; गायकाचा झाला संताप

लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?