या वर्षी आलेल्या बहुसंख्य आयपीओंना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे यातील बऱ्याच आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना(investors) चांगले रिटर्न्स दिले. काही आपयीओंनी तर गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले.
या वर्षी ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ आला. या आयपीओलाही गुंतवणूकदारांनी(investors) चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, ह्युंदाईनंतर लवकरच आणखी एक दमदार आयपीओ येण्याची शक्यात आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ जगभरात मोठं नाव असलेल्या टाटा उद्योग समूहाचा असू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार टाटा सन्स चा आपयीओ लवकरच येऊ शकतो. कारण नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय दिला आहे. टााट उद्योग समूहाने आरबीआयकडे टाटा सन्स या कंपनीला शेअर बाजारावर सूचिबद्ध न करण्याची सूट मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र आरबीआयने ही विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयानंतर टाटा उद्योग समूहाला टाटा सन्सचा आयपीओ घेऊन यावा लागणार आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांसाठी चांगल्या परताव्याची ही एक चांगली पर्वणी असू शकते.
आरबीआयच्या निर्णयानंतर टाटा सन्सचा आयपीओ येण्याची शक्यता वाडली आहे. विशेष म्हणजे टाटा सन्सचा आयपीओ येण्याची शक्यता लक्षात येताच गुंतवणूकदारांनी टाटा उद्योग समूहाच्या इतर कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. टाटाच्या काही कंपन्यांच्या शेअरचे मूल्य चांगलेच वाढले.
सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सत्र चालू असताना टाटा उद्योग समूहाच्या टाटा केमिकल्स या कंपनीचे शेअर्स साधारण 14 टक्क्यांनी वाढले. बाजार बंद झाला तेव्हा दिवसाअखेर हा शेअर 8.73 टक्क्यांच्या तेजीसह 1183 रुपयांवर बंद झाला. टाटा इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे शेअर्सही साधारण 9 टक्क्यांनी वाढले. मात्र बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 3.60 टक्क्यांपर्यंत वाढून 7059.80 रुपयांवर पोहोचला. यासह तेजस नेटवर्क या कंपनीच्या शेअरमध्येही सत्र चालू असताना 11.04 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 3.57 टक्क्यांच्या वाढसह बंद झाला.
दरम्यान, आरबीआयच्या निर्णयानंतर टाटा उद्योग समूहाला टाटा सन्स या कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारावर सूचिबद्ध करावे लागणार आहे. म्हणजेच टाटा सन्स या कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2025 पर्यंत येण्याची शक्यता आहे. टाटा सन्स या कंपनीवर सध्या 20,270 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
एका अंदाजानुसार टाटा सन्स या कंपनीचे एकूण मूल्य हे 11 लाख कोटी रुपये असू शकते. म्हणजेच या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून आपल्या फक्त 5 टक्के शेअर्स विकले तरी त्या आयपीओचा आकार तब्बल 55 हजार कोटी रुपयांचा होईल. म्हणजेच हा आयपीओ ह्युंदाई मोर्टसपेक्षाही मोठा असू शकतो. ह्युदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ 27,870 कोटी रुपयांचा होता. हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वांत मोठा आहे.
हेही वाचा:
प्राण्यांच्या शिरा आणि हाडांची बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त
‘क्राइम पेट्रोल’मध्ये पोलिसाची भूमिका अन् आता स्वत:चं केला गुन्हा, अपहरण प्रकरणात अभिनेत्रीला बेड्या
भाजपची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच जाहीर होणार, नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता!