मोठी बातमी: ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला…

मुंबई: शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिक(news) आणि पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे शनिवारी निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

मात्र, शनिवारी सकाळी(news) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. पांडुरंग सकपाळ यांच्या निधनामुळे ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.

दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख होती. पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते.

Shivsena Thackeray Camp leader in South Mumbai Pandurang Sakpal dies passes  away in Mumbai | Pandurang Sakpal: मोठी बातमी: ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक हरपला,  दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख ...

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरसुद्धा पांडुरंग सपकाळ हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत राहिले. पक्षाच्या पडत्या काळात दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवत ठेवण्यात पांडुरंग सकपाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्याकडे अनेक वर्षे दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक १२ च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी होती.

मात्र, 2023 साली उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तेव्हा त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले होते. पांडुरंग सकपाळ यांनी 2019 मध्ये मुंबादेवी मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय, महाविकास आघाडीच्या महामोर्चाची मुख्य जबाबदारी देखील पांडुरंग सकपाळ यांनी सांभाळली होती.

हेही वाचा :

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याची 70 टक्के संपत्ती नताशाच्या वाट्याला? 

सांगलीत कृष्णाकाठी आली चिखल पळवणारी टोळी, टोळीचा लक्षवेधी गोंगाट

सांगली : हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ