राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक बिघडली आहे. यामुळे त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आलं आहे. आडवाणी हे सध्या 97 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. आज त्यांना दिल्लीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
मागच्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आलं आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज पुन्हा आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय.
याच वर्षी लालकृष्ण आडवाणी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देखील प्रदान करण्यात आला. प्रकृतीच्या समस्येमुळे ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला. मागील महिन्यात 8 नोव्हेंबररोजी त्यांचा वाढदिवस होता. यानिमित पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो देखील शेअर केला होता. ज्यामध्ये पीएम मोदी लालकृष्ण अडवाणींना पुष्पगुच्छ देताना दिसून आले होते. आज आडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत.
हेही वाचा :
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान…! मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीचा सोहळा
2040 पर्यंत मृतांचा आकडा 80 लाखांवर, भारतावर मोठं संकट
खूप कामाची आहे Flipkart ची VIP मेंबरशिप! मिळतात अनेक फायदे