मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली(shot) आहे. पंजाबमधील मोगाचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येत आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पंजाबमध्ये आता वातावरण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत, या घटनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे, तसेच त्यांनी यावेळी पंजाब सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘पंजाब राज्याच्या मोगाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून अत्यंत क्रूरपणे हत्या(shot) करण्यात आली. ही खूप दु:खद घटना आहे. पंजाबमधील खलिस्तानी समर्थक लोकांनी एका शिवसैनिकाची खुलेआम हत्या केली. ही घटना पंजाब सरकारच्या जर्जर झालेल्या सरकारी व्यवस्थेला समोर आणते. पंजाबमधील आप सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. या हत्येमधील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

या दु:खाच्या प्रसंगी स्व. मंगतराम यांच्या कुटुंबासोबत शिवसेना पूर्ण ताकदीने उभी आहे, शिवसेनेच्या वतीनं मंगतरामजी यांच्या कुटुंबाला तातडीनं 10 लाख रुपयांची आर्थिक मदत (shot)करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुत्वच्या प्रति पूर्णपणे समर्पित असलेल्या शिवसेना पक्षाचे कर्मठ जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रभक्त मंगतराम मंगा यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

हेही वाचा :

तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ची पहिली झलक; ‘एका बुक्कीत टेंगुळ’ डायलॉगने घातला धुमाकूळ!