भाजप(politically) नेत्या नवनीत कौर या अमरावती लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी त्यांचा पराभव केला. अशात नवनीत राणा यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
नवनीत राणा यांना भाजपकडूनच (politically)नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत पुन्हा उमेदवारी द्यावी मागणी करण्यात आली आहे. भाजप नेत्या नवनीत राणा या नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा केली. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेडची जागा रिक्त झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानादिवशीच म्हणजे 20 नोव्हेंबरलाच या लोकसभेसाठी मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल असणार आहे.
नांदेडची पोटनिवडणूक घोषित झाल्यानंतर काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. रविंद्र चव्हाण हे नांदडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्याच महिन्यात महाराष्ट्र दौरा केला होता, त्यावेळी नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली होती. त्याचवेळी, येथील पोटनिवडणुकीत रविंद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं.
पोटनिवडणुकीत रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात नवनीत राणांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा:.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आरोपीचा पक्षप्रवेश
Airtel चा 365 दिवसांचा स्वस्त प्लॅन, 24 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद
सुशांत सिंहच्या घरात अदा शर्माला वाटते भीती? अभिनेत्याचा भास झाला? अभिनेत्री म्हणाली…