राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यासाठी आज मंगळवारपासून बेमुदत(st) संप पुकारला आहे. या संपामुळे अनेक जिल्ह्यात लालपरीचे चाके थांबले आहेत आणि बसेस डेपोमध्येच उभ्या आहेत. त्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे आणि सरकारकडून तातडीने या संपावर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून, मंत्री उदय सामंत यांनी एसटी(st) कामगार संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लवकरच एसटी कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
दुपारी 12 वाजता सरकारमधील मंत्र्यांनी आणि एसटी संघटनांना बैठकासाठी बोलावले आहे. या बैठकीला एसटी संघटनांनी हजेरी लावणार का, याबाबत अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी खाजगीकरण बंद करणे, सुधारित कार्यपद्धती रद्द करणे, मेडीकल कॅशलेस योजना लागू करणे, जुन्या बस बदलून नवीन बस खरेदी करणे, अद्यावत विश्रांतीगृह प्रदान करणे, आणि निवृत्ती वेतन संबंधित अडचणी दूर करणे यासारख्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. तसेच, विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांना मोफत पास देण्याची मागणी केली आहे.
सरकारकडून यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असून, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पुढील पावले कोणती असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
अंबाबाईच दर्शन घेणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती
धक्कादायक! काँग्रेस नेत्याने कुटुंबासह आयुष्य संपवलं
भाजपला मोठा धक्का, समरजितसिंह घाटगे ‘तुतारी’ फुंकणार; आज होणार जाहीर पक्षप्रवेश