एअरटेल ग्राहकांना मोठा दिलासा; कंपनीने सुरू केली फ्री रिचार्जची सुविधा

देशातील दूरसंचार सेवा प्रदाता असलेली एअरटेल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी(airtel customers) पुन्हा एकदा मदतीस पुढे सरसावली आहे. ईशान्य भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे मणीपूर, मिझोरम आणि मेघालय या राज्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या संकटात्मक परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी airtel पुढे आलं आहे.

या राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोबाईल नेटवर्क व्यवस्थित काम करत नसल्यामुळे एअरटेलने(airtel customers) ईशान्य भारतातील आपल्या ग्राहकांसाठी खास मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रीपेड ग्राहकांना पुढील काही दिवसांसाठी दररोज 1.5GB मोफत डाटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर पोस्टपेड ग्राहकांनाही बिल भरण्याची मुदत वाढवून मोठा दिलासा दिला आहे.

पूर्वेकडील भारतात अतिवृष्टीमुळे नेटवर्क व्यवस्थित काम न करत असल्याने लोकांचे मोबाईल नेटवर्कवर अवलंबून असलेले व्यवहार आणि संवाद अडचणीत आले आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये एअरटेलने आपल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा खास ऑफर दिला आहे. या अंतर्गत प्रीपेड ग्राहकांना दररोज 1.5GB मोफत डाटा आणि 4 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. यामुळे या भागातील लोकांना मदत होणार असून त्यांचे संपर्क आणि आवश्यक माहिती मिळविण्याची सोय सुलभ होणार आहे.

एअरटेलने नेहमीच आपल्या ग्राहकांच्या अडचणींना समजून घेतले आहे. याच हेतून कंपनीने पूर्वेकडील भारतातील आपल्या पोस्टपेड ग्राहकांनाही मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने बिल भरण्याची मुदत आणखी 30 दिवसांनी वाढवली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार असून त्यांचे संपर्क नेटवर्क चालू ठेवता येणार आहे.

या ऑफर्स व्यतिरिक्त, एअरटेलने त्रिपुरा मध्ये इंट्रा-सर्कल रोमिंग (ICR) नावाची नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे एअरटेल नेटवर्क सिग्नल कमजोर असलेल्या ठिकाणी एअरटेल ग्राहक दुसऱ्या नेटवर्कवरून कॉल करू शकणार आहेत. याचबरोबर इतर दूरसंचार कंपन्यांचे ग्राहकही या व्यवस्थे अंतर्गत एअरटेलच्या नेटवर्कवर कॉल करू शकणार आहेत. या उपक्रमामुळे या भागातील सर्व वापरकर्त्यांसाठी नेटवर्कची विश्वसनीयता वाढणार असून सतत संपर्क राखता येणार आहे.

हेही वाचा:

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस….

इचलकरंजी न्याय संकुलाला मंत्रिमंडळ बैठकीतून मंजुरी, वकील समूहात आनंदाचे वातावरण

राज्यातील यंत्रमागधारकांना विज बिलातील सवलतीसाठी प्रतिक्षा: वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यादेशाची प्रतीक्षा