गेली अनेक महिन्यांपासून दर तेजीत असलेल्या लसणाचे दर गेल्या आठवड्यात उतरले आहेत. तर (onion)कांद्याचे देखील दर कमी झाल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची ४२९१ क्विंटल आवक झाली तर पालेभाज्यांची ६१७०० गडड्या आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५३९ क्विंटल फळभाज्यांची आवक घटली अहे. तर पालेभाज्यांची १६०० गडड्यांनी आवक घटली आहे.
लसणाची किरकोळ बाजारात ३०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. (onion)कांद्याची रविवारी सर्वाधिक ८६२ क्विंटल आवक झाली असून, सरासरी १७५० क्विंटल रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात कांद्याची २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाट्याची ६९७ क्विंटल आवक झाली. त्याखालोखाल टोमॅटोची ६०९ क्विंटल आक झाली असून, किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर २० ते ३० रुपये राहिला.
थंडीमध्ये मटारची आवक वाढली असून, ४२० क्विंटल आवक झालेल्या मटारला ६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. तर गाजराची २१६ क्विंटल आवक होऊन ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.कोबीची ४२८ क्विंटल तर फ्लॉवरची ३०५ क्विंटल आवक होऊन गडड्याच्या आकारमानानुसार या फळभाज्यांची विक्री होत आहे. वांग्याची ९४ क्विंटल आवक झाली असून, किकोळ बाजारात ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मिरचीची १३६ क्विंटल आवक झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत १९ क्विमटलने घट होऊनही दर स्थिर राहिला. घेवट्याची ७६ क्विंटल आवक झाली, तर दोडक्याची अवघी ५ क्विंटल आवक झाली. काकडीची ७७ क्विंटल तर कारल्याची ८ क्विंटल आवक झाली.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची सर्वाधिक २९२०० गडड्या आवक झाली. त्याखालोखाल मेथीची ११००० गडड्या, पालक ५१०० गडड्या, पुदिना २९०० गडड्या, शेपू ३१०० गडड्या, कांदापात १५०० गडड्या, हरभरा ५५०० गडड्या, मुळा २२०० गडड्या तर चवळीच्या १२०० गडड्या आवक झाली. या सर्व पालेभाज्यांची सरासरी १० रुपये प्रति गड्डी विक्री होत आहे.
तुमच्यापैकी बरेच लोक कांदा, लसूण खातात. कांदा-लसूण प्रत्येकाच्या आहारात महत्त्वाचा घटक असतो. दररोज या पदार्थांचे सेवन केले जाते. अनेकांना तर त्याच्याशिवाय खाण्याचा आनंद घेता नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक जण कांदा-लसूण खाणे टाळतात.
शाकाहारातल्या जैन आणि वैष्णव प्रकारच्या जेवणात कांदा आणि लसूण खात नाहीत. इतरही बर्याच घरांत विशेषतः कोणत्याही गणपती, चातुर्मास अशा धार्मिक काळात केलेल्या स्वयंपाकातही कांदा आणि लसूण वापरत नाहीत.
हेही वाचा :
जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, संघर्ष सुरूच: सुप्रिया सुळे यांचं आंदोलन
VIDEO : जाहीर सभेत ‘आप’ नेत्याचा संताप: बेल्टने स्वतःला मारून घेतलं
मोठी बातमी! सरपंच संतोष देशमुख यांचा मारहाणीचा व्हिडीओ CID च्या हाती???