राज्याच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप घडल्याचे दिसून आले(political). दोन वर्षांआधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना आपल्यासोबत घेत बंड केला होता. त्यामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली होती. यामुळे उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला होता. मात्र अशा परिस्थितीत मतदारांनी त्यांच्या मनातील द्वेष लोकसभा निवडणुकीत दाखवला.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह(political) देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला होता. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे पक्ष चिन्ह दिलं. याचाच मतदारांच्या मनात राग होता त्याचे पडसाद हे लोकसभा निवडणुकीत उमटले.
त्यानंतर आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक दिलासा दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निधी स्वीकारता येणार असल्याची मंजूरी दिली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे गट आनंदी आहे.
शिवसेना पक्षाच्या फूटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील अशीच परिस्थिती झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यासह काही आमदार सोबत घेत भाजसोबत हात मिळवणी केली. यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. निवडणूक आयोगाने देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचा असल्याचा निर्णय दिला. मात्र काही दिवसांआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील निधीबाबत सकारात्मक निर्णय दिला. त्यानंतर आता शिवसेनेबाबत दिलासादायक माहिती समोर आली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीने एकूण 17 जागांवर विजय मिळवला आहे. यानंतर आता महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी स्ट्रॅटर्जी आखत आहे.
लोकसभा निवडणुकीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांना चांगला फायदा होऊ शकतो अशी शक्यता आहे. येत्या काही महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.
हेही वाचा :
केसांच्या समस्यांवर रामबाण उपाय! योगासनांनी मिळवा सुंदर व घनदाट केस
निवडणुका जवळ आल्या की ‘लाडक्या’ योजनांचा पाऊस, मतदार संभ्रमात
नोकरीसोबतच पूर्ण करा इंजिनीअरिंग, एमबीएचे स्वप्न! वर्किंग प्रोफेशनल्ससाठी खुली संधी