सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील(bank) दुष्काळ निधी बाबत ६ शाखांमध्ये एकूण २ कोटी ४३ लाखांचा घोटाळा झाला असल्याचा उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करत ८ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील(bank) दुष्काळनिधीबाबत ६ शाखेत एकूण दोन कोटी ४३ लाखांचा घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळयाप्रकरणी एकूण आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून २१९ शाखांमध्ये जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून तपासणी मोहीम देखील सुरू आहे.
त्यामुळे दोन दिवसाच्या तपासणीनंतर दुष्काळ आणि अवकाळ निधीवर मारण्यात आलेला डल्ल्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जिल्हा बँकेतल्या या दुष्काळ आणि अवकाळ मदत निधीतील गैरव्यवहार प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम 25 ते 30 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या प्रकरणी सहकार विभागामार्फत चाचणी लेखा परीक्षण करण्यात यावे. आणि सबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाकडून करण्यात येत आहे. याबाबतीत आम्ही सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करणार असल्याचेही स्वतंत्र भारत पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत युवकांमधील गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या तुरुंगात; कुणावर काय आरोप?
बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ