पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा हादरा! शरद पवार यांचा भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का 

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात(political news) मोठा भूकंप झाला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला आणि अजित पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत आज रात्री शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा राजीनामा आणि राष्ट्रवादीत प्रवेश
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपला राजीनामा विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. त्यांचा पक्षप्रवेश आज रात्री पार पडणार असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला(political news) मोठा धक्का बसला आहे. रणजितसिंह हे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत.

राजेंद्र शिंगणेचा देखील शरद पवार गटात प्रवेश
याच घडामोडींच्या दरम्यान, अजित पवार गटाला सोडून माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी ५ वाजता हा प्रवेश राष्ट्रवादीच्या अधिकृत कार्यालयात पार पडेल. शिंगणे यांचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे, कारण त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी बंडखोरीची धमकी दिली होती.

विधानसभेच्या रणसंग्रामासाठी जोरदार मोर्चेबांधणी
या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची ऊर्जा मिळाली आहे. गेल्या काही आठवड्यांत राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर नवीन नेत्यांचा ओघ सुरु आहे, ज्यामुळे महायुतीतील गोंधळ वाढला आहे. विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना या राजकीय बदलांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा:

राज्य सरकारने थांबवली मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना;काय आहे कारण?

दिवाळीआधीच ‘या’ बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका; बचत खात्यावरील व्याजदरात कपात

संजय दत्त पुन्हा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, ‘मुन्ना भाई 3’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट