भारताला मोठा धक्का, ऋषभ पंतला दुखापतीमुळे मैदानंच सोडावं लागलं

बंगळुरु : भारतीय संघाला(team india) ऋषभ पंतच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. कारण हा सामना सुरु असताना पंतच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला थेट मैदानाबाहेर जावे लागले.

ही गोष्ट घडली ती ३७ व्या षटकात. त्यावेळी भारताचा आर. अश्विन हा गोलंदाजी(team india) करत होता. यावेळी न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे हा त्यावेळी फलंदाजी करत होता. या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ही गोष्ट घडली. यावेळी अश्विनच्या चेंडूचा सामना करत असताना कॉनवे फसला. कारण त्याला अश्विनने नेमका कसा चेंडू टाकला आहे, हे समजले नाही. त्यामुळे हा चेंडू त्याला मारताच आला नाही. या चेंडूने त्याला चकवा दिला आणि आता कॉनवे आऊट होणार, असे वाटत होते.

अश्विनच्या या चेंडूवर कॉनवे फसला आणि त्यामुळे पंतला त्याला बाद करण्याची चांगली संधी निर्माण झाली होती. पंतसाठी ही एक सुवर्णसंधी होती. कारण कॉनवे हा भारताच्या मार्गात मोठा अडसर ठरत होता. त्यामुळे आता कॉनवे बाद होणार, असा आनंद भारताच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण जसा चेंडूने कॉनवेला चकवा दिला तसा तो पंतलाही दिला.

पंत यावेळी चेंडू पकडण्यासाठी गेला खरा, पण त्याला अंदाज चुकला त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातात आला नाही, तर हा चेंडू त्याच्या पायाच्या गुडघ्याला लागला. हा चेंडू एवढ्या जोरात लागला की पंत त्यानंतर मैदानातच बसला. त्यानंतर भारतीय संघाचे डॉक्टर आले आणि त्यांनी पंतवर उपचार केले. पंतची ही दुखापत गंभीर होती. त्यामुळे त्याला थेट मैदानाच्या बाहेर नेण्यात आले. डॉक्टर पंतला घेऊन मैदानाबाहेर आले. त्यावेळी पंतची जागा ही ध्रुव जुरेलने घेतली.

पंतचा यापूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे ही दुखापत जर पुन्हा बळावली तर पंतबरोबरच ती भारतासाठीही वाईट बातमी ठरू शकते. त्यामुळे आता पंतची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि त्यानंतर त्याच्या दुखापतीचे स्वरुप समजता येऊ शकेल.

हेही वाचा:

सांगलीच्या पालकमंत्र्यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला

वानखेडेंच्या राजकीय इनिंगला ब्रेक; शिवसेनेकडून निवडणूक लढवणार नाही

दारूच्या नशेत व्यक्तीचा अजब कारनामा; बैलासमोर गेला अन्…Video