नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात उद्धव ठाकरेंच्या(current political news) शिवसेनेचे 6 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान नव्या वर्षात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा अंतर्गत गोटात सुरु आहे.

निवडणुकीत(current political news) आणि निवडणूकनंतर वरिष्ठ नेत्यांनी दखल न घेतल्याची भावना राजन साळवी यांच्या मनात असल्याचे म्हटले जाते. साळवी यांच्या कुटुंबियांच्या मागे पुन्हा एसीबीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे राजन साळवी महिनाभरात मोठा निर्णय घेऊ शकतात असे म्हटले जाते. राजन साळवी भाजप की शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार? याबाबतीत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

हेही वाचा :

धोनी म्हणतो, बायकोच्या ‘त्या’ कॉम्प्लिमेंटपेक्षा मोठं काही नाही!

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा झटका

सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा, भर कार्यक्रमात म्हणाली ‘तो मला खूप…’