RCB विरुद्ध सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! विकेटकीपर स्पर्धेतून बाहेर…

इंडियन प्रीमियर लीग(competition) 2024 च्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. विष्णू विनोदच्या जागी मुंबई इंडियन्सने हार्विक देसाईचा संघात समावेश केला आहे. विनोद दुखापतीमुळे चालू हंगामातून बाहेर आहे.

केरळचा खेळाडू विष्णू विनोद दुखापतीमुळे(competition) आयपीएलच्या 17 व्या मोसमातून बाहेर पडला आहे. विनोदच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून तो या स्पर्धेच्या हंगामात सहभागी होणार नाही. सौराष्ट्राचा यष्टिरक्षक फलंदाज हार्विक देसाई आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्समध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे.

हार्विक देसाई गेल्या काही वर्षांपासून सौराष्ट्रासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. आणि तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. युवा खेळाडू आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवतील अशी आशा आहे. देसाई 2018 मध्ये भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. शुभमन गिल, शिवम मावी हे देखील या टीमचे सदस्य होते. देसाईने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी फटकेबाजी केली होती.

आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत विशेष राहिलेली नाही. संघाला पहिल्या 3 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. याआधी मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा :

भारतीय संघातील सीता आणि गीता कोण आहे? विराट कोहलीने केला खुलासा

गुगलचं यूजर्सना खास गिफ्ट! फोटो एडिटिंगचे एआय टूल्स सगळ्यांना मिळणार मोफत

शरद पवारांनी डाव टाकलाच! ‘हा’ नेता घेणार तुतारी हाती; पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला