अजित पवार गटाला मोठा धक्का! केंद्रात एकही मंत्रिपद नाही?

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारचे|(ministry) नेते म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं असलं तरी राज्यात मागील वर्षी सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला एकही मंत्रिपद आजच्या शपथविधीमध्ये दिलं जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ministry)हे अजित पवार गटाचे राज्यातील एकमेव खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या घरी बैठकीसाठी गेले आहेत. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत इतर मंत्रीही उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे.

सदर बैठक ही अजित पवार गटाची मनधरणी करण्यासाठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या मेरीटनुसार अजित पवार गटाला तिकीट नाकारण्यात आलं आहे की यामागे इतर काही कारणं आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा :

मोदी मंत्रिमंडळात ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी, कुणाला लॉटरी ?

इचलकरंजीत यंत्रमागप्रश्‍नी उद्या होणार बैठक

सानिया मिर्झाची बॉलिवूडमध्ये एंट्री? बनणार हिरॉईन?