विटा : गेल्या वर्षभरात अडचणीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार(political updates) यांनी आपल्याला मोलाची साथ दिली आहे. परंतु महायुतीच्या जागा वाटपात खानापूर मतदारसंघ शिंदे गटाकडे जातोय. गेल्या 10 वर्षांतील भोंगळ कारभार रोखून सत्ताधाऱ्यांची सत्तेची मस्ती उतरविण्यासाठी आणि मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तसेच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची झालेली ससेहोलपट थांबविण्यासाठी सध्याच्या राजकीय अपरिहार्य परिस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपल्यासोबत असणे अतिशय गरजेचे बनलेले आहे. असे मत माजी आमदार सदाशिव पाटील यांनी व्यक्त केले.
येथील आदर्श महाविद्यालयाच्या(political updates) श्रीमती तानुबाई हणमंतराव पाटील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील प्रमुख उपस्थित होते. पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना आपल्यासोबत पक्षाची भक्कम ताकद आपल्यासोबत असली पाहिजे. त्यामुळेच आपण शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत घरवापसीचा निर्णय घेऊन तुतारी हाती घेऊया. त्यामुळे लवकरच एकजुटीने निर्णय करूया, असे मत व्यक्त केले.
वैभव पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर निवडणूक लढणे आवश्यक आहे. मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित आहे. ते सोडविण्यासाठी आपल्या विचारांचा लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. दरम्यान सुरेश चिंचणकर ( लेंगरे ) यांनी पाटील गटात प्रवेश केला. यावेळी संजय मोहिते , सचिन शिंदे, हर्षवर्धन बागल , रघुनाथ पवार, प्रविण पवार यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा:
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पदांसाठी भरतीला सुरुवात
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारची ‘सोनेरी’ भेट; ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज मुदतीस वाढ