विधानसभा निवडणुका(political news) आता तोंडावर आल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला. समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर, काही ठिकाणी अनेक नेते हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. आता अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
अहमदनगर येथे भाजपला(political news) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे त्यांचे पूत्र वैभव पिचड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. यातच त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे.
शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पिचड पितापुत्र यांनी भेट घेतली. त्यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पिचड कुटूंबीय पुन्हा एकदा घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा आता रंगत आहे. त्यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा शरद पवारांची भेट घेतली आहे. यासोबतच मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.
या भेटीवर भाजपकडून ते कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पिचड हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत होते. 2014 पर्यंत ते अकोले विधानसभेचे आमदार होते. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर वैभव पिचड विजयी झाले. मात्र, 2019 मध्ये वैभव पिचड आणि मधुकर पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
वैभव पिचड यांचा 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या किरण लमहाटे यांच्याकडून पराभव झाला. सध्या अकोले तालुक्यातील नगरपालिका आणि अगस्ती दूध संघावर पिचड यांचं वर्चस्व आहे. आता पिचड पितापुत्र यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाटचाल असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत पिचड पितापुत्र भाजपला धक्का देत तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. असं झाल्यास, भाजपला हा मोठा धक्का बसू शकतो.
हेही वाचा:
काकाच्या पाठीत खंजीर खुपसला; स्थानिकांमध्ये खळबळ, दोघांवर गुन्हा दाखल
मी शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालून…; अजित पवारांच्या विधानाची जोरदार चर्चा
रस्त्यावरून पळताना चिमुकलीला भरधाव ट्रकने चिरडले, मृत्यूचा थरारक Video Viral