एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी(atm) आहे. ग्राहकांना येत्या काळात मोठा धक्का बसू शकतो कारण एटीएममधून पैसे काढणे महाग होऊ शकते. याचे कारण एटीएम चालकांकडून शुल्क वाढवण्याची मागणी केली जात आहे.
अहवालानुसार एटीएम(atm) ऑपरेटर्सनी इंटरचेंज फी वाढवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI शी संपर्क साधला आहे. इंटरचेंज फी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाते. समजा एटीएम कार्ड एसबीआयचे आहे आणि एटीएम मशीन पीएनबीचे आहे.
अशा परिस्थितीत, व्यवहारासाठी एसबीआयकडून पीएनबीला इंटरचेंज फी भरली जाईल. बँका शेवटी या शुल्काचा भार ग्राहकांवर टाकतात. हे शुल्क वाढल्यास एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जास्त शुल्क भरावे लागणार आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (सीएटीएमआय)च्या मते हे शुल्क (इंटरचेंज फी) प्रति व्यवहार कमाल 23 रुपये वाढवले पाहिजे. इतर अनेक ऑपरेटर्सनीही प्रति व्यवहार 23 रुपये वाढवण्याची मागणी केली आहे.
इंटरचेंज फी 2021 मध्ये शेवटची वाढवली होती. त्यावेळी इंटरचेंज शुल्क प्रति व्यवहार 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले होते. त्यानंतर शुल्क फक्त 17 रुपये आहे. यापूर्वीचा बदल दीर्घ कालावधीनंतर करण्यात आला होता, मात्र यावेळी विलंब होणार नसल्याचे ऑपरेटर्सचे म्हणणे आहे. आता लवकरच बदल शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
शरद पवार, सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
ICC चा नवा नियम मदतीला धावला; भारताला फुकटच्या 5 धावा मिळाल्या
शेअर बाजारात जोरदार तेजीची शक्यता; अंबुजा सीमेंट-फेडरल बँकसह ‘या’ शेअर्सवर ठेवा लक्ष