ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का….

भारताच्या महिला बॉक्सरला पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच मोठा धक्का बसला आहे.(define before) वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणारी परवीन हुड्डाने आपला पॅरिस ऑलिम्पिक कोटा हा जवळपास गमावला आहे. वाडाने परवीन हुड्डाला 12 महिन्यांसाठी निलंबित केलं आहे.

परवीनने 57 किलो वजनी गटात एशियन गेम्स 2023 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक(define before) कोटा मिळवला होता. मात्र परवीनला ती एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत कुठं होती हे वाडाला सांगण्यात अपयश आलं आहे. नियमानुसार जागतिक उत्येजक द्रव्य विरोधी समितीने (वाडा) दीड वर्षासाठी निलंबित केलं आहे. तिचं निलंबन हे या महिन्यापासून सुरू होत आहे. ही निलंबनाची कारवाई नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. याबाबतची माहिती परवीनचे कोच सुधीर हुड्डा यांनी पीटीआयला दिली आहे.

परवीनच्या बाबतीत आता काय पर्याय आहे याबाबत तिचे वकील विदुश्पत सिंघानिया यांनी सांगितले की ते आंतरराष्ट्रीय चाचाणी समितीच्या संपर्कात आहेत. परवीवरील बंदी कमी करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, ‘आम्ही वाडा आणि ITA सारख्या काही समितींच्या संपर्कात आहोत. आम्ही शिक्षा कमी करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे करत आहोत.

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही त्यांनी परवीनबाबत दिलेली नोटीस मागे घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहोत. जर असं झालं तर तिच्यावर कोणतीही बंदी असणार नाही. आम्ही यााबबत तातडीनं पावलं उचलत आहोत. कारण त्याचा परिणाम ऑलिम्पिक कोट्यावर होण्याची शक्यता आहे.’

जरी परवीनचे वकील जोरदार प्रयत्न करत असले तरी तिचा ऑलिम्पिक कोटा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. परवीन जर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकली नाही तर भारताची एक पदकाची आशा असलेली खेळाडू कमी होणार आहे.

सध्या भारताच्या चार महिला बॉक्सर ऑलिम्पिकसाठी पात्र झाल्या आहेत. यात निखत झरीन (50 किलो), प्रिती (54 किलो), परवीन (57 किलो) आणि लोव्हलिना बॉरगोहीन (75 किलो) या खेळाडूंचा समावेश आहे. सध्या तरी एकाही पुरूष बॉक्सरला ऑलिम्पिक कोटा

हेही वाचा :

दबाव असल्याने हार्दिक पांड्याची निवड? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का! युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

हृतिक रोशनची पहिली पत्नी पुन्हा करणार लग्न? मोठी अपडेट समोर…