मुंबई : राज्यामध्ये अनेक दिवसांपासून मराठा आरक्षण(reservation) हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मागील एक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण, आंदोलनं केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळातील सरकारमध्ये मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
हाय कोर्टाकडून मान्यता मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते फेटाळले होते. तेव्हा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीची वेळ जवळ आली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये मराठा आरक्षण(reservation) हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. लोकसभा निव़डणूकीप्रमाणे विधानसभा निवडणूकीवर देखील याचा परिमाण होणार आहे. आता मराठा आरक्षणाबाबत एक सकारात्मक पाऊल पडत असल्याचे दिसत आहे. आरक्षणाच्या याचिकेवर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. आता या सुनावणीची तारीख समोर आली आहे. निवडणूकांच्या तोंडावर सकारात्मक निकाल आल्यास महायुतीच्या बाजूने ऐतिहासिक आणि मोठा निर्णय जाहीर होईल. याचा महायुतीसह भाजपला मोठा फायदा होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर येत्या दोन दिवसांमध्ये सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून 11 सप्टेंबर ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेवर येत्या 11 सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत अधिकची माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, “सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मी आणि राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु असली तरी न्याय अद्याप मिळालेला नाही.
11 सप्टेंबरला 1001 क्रमांकाची सुनावणी आहे. 11 सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल. सरकारने प्रयत्न केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल. कारण त्यांना कल्पना आहे, माहिती आहे की, न्यायालयात कधीकधी कशाप्रकारे जावं लागतं. त्यांनी ते करावं, अशी अपेक्षा मला आणि समाजाला आहे,” अशी आशा विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्…
विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का! माजी आमदार करणार काँग्रेसमध्ये घरवापसी
या भारतीयांनी भोगलाय तुरुंगवास! कोणावर हत्येचा गुन्हा तर कोणावर….