पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या(video) झाळून कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले. तसेच यानंतर वनराज आंदेकर कोयत्याने वार देखील केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर घटनेचं भयानक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे.
नाना पेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास(video) सात दुचाकीवरुन जवळपास 14 ते 15 जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढतात.
वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन खून केला होता. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जयंत कोमकर आणि गणेश कोमकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे सध्या समोर आली आहे.
पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की, रविवारी संध्याकाळी (2 सप्टेंबर) साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलेले आहेत.
हेही वाचा:
अजित पवारांसाठी नवा धक्का? शरद पवारांच्या साथीची चर्चा
पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना
“शिवाजी महाराजांची तुलना सावरकरांशी? पवारांची मोदींवर सडकून टीका”