लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण(trumpet) बदललं आहे. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची मोठी ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बहुमताचा आकडा गाठणार, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महायुतीतील अनेक नेते महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहे.
एकीकडे, भाजपमधील समरजित घाडगे शरद पवार (trumpet) यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली असतानाच आता दुसरीकडे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील देखील आगामी काळात पक्षबदल करण्याच्या तयारीत आहेत. ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या आहे. त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केल्यानंतर या चर्चांनी आणखीच जोर धरला आहे.
माध्यमांसोबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे मोठे नेते असून ते लवकरच मोठा निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा असेल. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या या सूचक विधानानंतर इंदापूर मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात उलट सुलट चर्चांना उधाण आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन पाटील हे भाजपाच्या तिकिटावर इंदापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र, सध्या हा मतदारसंघ अजित पवार यांच्या ताब्यात आहेत. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2019 साली त्यांनी कमी मताधिक्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला जागा सोडण्यात येईल, असा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. याचाच अर्थ इंदापूर विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, असं असलं तरी त्यांनी यासंदर्भात कोणतेही विधान केले नाही. मात्र, पडद्यामागून हर्षवर्धन पाटील यांची शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्यास, हा भाजपसाठी मोठा धक्का असेल.
हेही वाचा:
त्यांचं सुरक्षित सत्ताकारण, कार्यकर्त्यांसाठी असुरक्षित!
रोज तुळशीच्या पानांची सेवन केल्याने शरीर आणि मनावर विविध प्रकारचे फायदे
राज्यात पावसाचा कहर: नाशिक,कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये संततधार पाऊस
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ‘करा उपवास’ संदेश; भक्तांची खास तयारी