काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, तब्बल 100 पदाधिकारी देणार राजीनामा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसला(political news) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि एनएसयुआय पुणे सरचिटणीस कृष्णा साठे यांच्यासह तब्बल 100 पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत(political news) मोठ्या पराभवानंतर काँग्रेसला अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे आणखी जोर धरताना दिसत आहेत.

पुण्यातील काँग्रेसमध्ये असंतोष वाढल्याने पक्षातील पदाधिकारी सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.

काही मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 2-3 दिवसांत रोहन सुरवसे पाटील आणि अन्य 100 पदाधिकारी काँग्रेसला रामराम ठोकणार आहेत. भारतीय जनता पक्ष (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा प्रवेश सुरू असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.

या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुढील राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

हेही वाचा :

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले