‘ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही…; जया बच्चन यांचा व्हिडीओ Viral

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील नात्यावर(binge watch) चर्चा सतत रंगत आहे. अंबानींच्या कार्यक्रमात किंवा अन्य ठिकाणी ऐश्वर्या एकटीच स्पॉट होण्याच्या चर्चांमुळे अनेक तर्कवितर्क होऊ लागले आहेत. विशेषतः अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर, या चर्चांना अधिकच धार आली आहे.

या चर्चेत आता जया बच्चन यांचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर(binge watch) व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जया बच्चन करण जोहरशी बोलताना दिसतात आणि ऐश्वर्या रायच्या गुणांविषयी प्रशंसा करतात. जया म्हणतात, “ती स्वत: खूप मोठी स्टार आहे, पण आम्ही सगळे एकत्र असताना ती स्वत: ला पुढे करण्याची किंवा तिचा स्टॅन्ड घेण्याची गरज समजते. ती शांत राहते, ऐकते, आणि कुटुंबात चांगली समरसून बसते.”

पण या व्हिडीओवर लोकांचा ट्रोलिंगचा आलेला प्रतिसाद अधिकच चर्चेचा विषय बनला आहे. काही नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या टिप्पण्यांवर टीका केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “टॉस्किस सासू, मागे उभं राहण्याविषयी बोलते… गप्प बस.” दुसऱ्या नेटकऱ्यांनी प्रश्न केला, “तुम्ही स्वत:च्या मुलीसोबत देखील असंच शिकवशील का?”

तसंच, अभिषेक बच्चन देखील चर्चेत आले आहेत कारण त्यांनी नुकतीच एक पोस्ट लाइक केली होती ज्यात घटस्फोटाविषयी चर्चा केली गेली होती. या पोस्टमुळे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेने जोर धरला होता, पण काही काळानंतर अभिषेकने त्या पोस्टवरचं लाइक काढून टाकलं.

या सर्व घटनेमुळे बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबातील घटनांवर बारकाईने लक्ष देण्यात आले आहे, आणि यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांचे वारे वाहत आहेत.

हेही वाचा :

जंक फूड खाल्ल्याने मुलांना होत आहेत हे धोकादायक आजार

अमित शाह यांची शरद पवारांवर टीका; सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर

सरकारी योजनेच्या नावाने फसवणूक: महिलेचे दागिने पळविले