मुंबई : राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला (politics)पर्याय म्हणून स्थापन करण्यात आलेली परिवर्तन महाशक्ति 4 नोव्हेंबरला मोठा राजकीय स्फोट करणार असल्याचे प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तर आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
बच्चू कडू म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती(politics) दोघांनाही जनता कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागा वाटपामध्ये तिढा आहे. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. आम्ही मुद्द्यावर लोकांमध्ये जाऊ. चार तारखेला पूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट होईल. महाशक्ती हा स्फोट करणार आहे, असे ते म्हणाले.
चांगले उमेदवार आणि चांगले मतदारसंघ आमच्याकडे आलेले दिसणार आहेत. महायुती काय आणि आघाडी काय, त्यांनी फक्त आमचा वापर केला. त्यांना धडा शिकवायचा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
जरांगे पाटील यांच्याशी काही बोलणे झाले नाही. मात्र, युती आणि आघाडी या दोघांचाही पराभव हे आमचे प्राधान्य आहे. उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. 4 नोव्हेंबरला सगळे स्पष्ट होईल आणि मोठा स्फोट पाहायला मिळणार आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार, असे म्हणत बच्चू कडूंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला.
मुख्यमंत्री शिंदेंची कडू यांनी भेट घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याबाबत कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची बातमी मीही पाहिली. पण, भेट कशी झाली, मला माहिती नाही, मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे..
हेही वाचा:
तलावात बुडून दोघांचा दुर्देवी मृत्यू
पोटात लाथ मारल्याने विवाहितेचा गर्भपात; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय