आज विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपत आहे. कारण 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी महत्वपूर्ण लढत होत आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदार संघातील लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. कारण कन्नड मतदार संघात पती आणि पत्नीमध्ये जोरदार लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेना उमेदवार(candidate) संजना जाधव आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये लढत होणार आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव अशी लढत होत आहे. कारण शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार(candidate) संजना जाधव यांना सभेदरम्यान अश्रू अनावर झाले आहे. कन्नडमधील एका गावात भाषणामध्ये त्यांनी नवऱ्याकडून काय काय सोसले हे सांगितले आहे. तसेच यावेळी त्यांना रडू देखील कोसळले आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांची ती मुलगी आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न केल्यानंतर काय काय सोसले? हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून पाणी आले आहे. मात्र त्यांना थोडा वेळ भाषण थांबावावे देखील लागलं आहे. त्यावेळी संजना जाधव यांना रडू कोसळले आहे.
यावेळी संजना जाधव म्हणल्या की, मी गावात सून म्हणून आले. परंतु गावाने मला मुलीसारखे प्रेम दिले. तसेच माझ्यावर अनेक संकटे दिखील आले आणि माझ्यावर अनेक अत्याचार देखील झाले आहेत, पण मी बोलून दाखवले नाही. कारण ती आपली संस्कृती नाही. तसेच मी लग्न होऊन एका महिन्यात आल्यावर वडिलांना सर्व काही सांगितले.
परंतु वडील म्हणाले की, मुल झाले की हा व्यक्ती सुधरेल. परंतु, त्यांमध्ये सुधारणा झाली नाही. मात्र त्यानंतर वडील म्हणत होते, 40 वर्ष झाली की हा व्यक्ती सुधरेल. परंतु तो व्यक्ती काही सुधारला नाही, म्हणून माझ्या ठिकाणी कोणास आणले, हे तुम्हाला काही माहीत आहे. मात्र माझी जागा घेण्याचा त्यांनी प्रयत्न देखील केला, पण ती जागा घेता आला नाही असे सांगताना संजना जाधव यांना रडू कोसळले आहे.
हेही वाचा :
रूपया खोटा निघाला…भरणेंना पाडायचं, पाडायचं, पाडायचं; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये गर्ल्स नाईट आऊट: तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू….Video
सगळ्या राज्यांत दारुबंदी जाहीर करा आणि मग…; संतापलेल्या भारतीय गायकाची कॉन्सर्टमध्ये मागणी