मध्यप्रदेशातील सिंग्रौली जिल्ह्यातील कोतवाली ठाण्यात एक अजब घटना घडली आहे. एका भाजप(leadership skills) नेत्याने सहाय्यक उपनिरीक्षक विनोद मिश्रा यांना वर्दी उतरवण्याची धमकी दिल्यानंतर ASI ने संतापाच्या भरात स्वतःच वर्दी काढली. या घटनेचा CCTV फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
ही घटना सिंग्रौलीतील नाली वादाच्या संदर्भात आहे. वाद थेट कोतवाली ठाण्यात पोहोचला होता, आणि त्यावर ठाण्यातील निरीक्षकांच्या (टीआय) चेंबरमध्ये चर्चा सुरू होती. याच बैठकीत भाजप(leadership skills) नगरसेवकाचे पती अर्जुन गुप्ता यांनी ASI विनोद मिश्रा यांना धमकी दिली की, “आम्ही तुझी वर्दी उतरवू!” या धमकीमुळे ASI ने स्वतःवरचा ताबा गमावला आणि सर्वांच्या समोर आपली वर्दी काढली.
ही घटना तब्बल आठ महिन्यांपूर्वीची असली तरी आता या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे. फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. सात महिन्यांपूर्वी या घटनेमुळे ASI विनोद मिश्रा यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती. मात्र, आता फुटेज लीक झाल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजच्या लीक प्रकरणाची गंभीर दखल घेत सिंग्रौलीच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. फुटेज लीक कसे झाले आणि यामागे कोण आहे, याची चौकशी सुरू झाली असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनेने पोलीस दलातील तणावपूर्ण नातेसंबंध आणि राजकीय हस्तक्षेपाचे वास्तव समोर आणले आहे. व्हायरल फुटेजने पोलीस विभागाला धक्का दिला असून संबंधित घटनेच्या चौकशीसह या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा:
ढोलवर बसून डान्स करायला गेला अन्…; असे काही झाले की…Video
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
UPI व्यवहाराची मर्यादा वाढली; एका दिवसात ‘इतके’ पैसे ट्रान्सफर होणार