भाजप आमदाराच्या ताफ्यातील कारची दुचाकीला धडक;, 2 जण जागीच ठार

सातारा : आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला (political news)उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. अनिकेत नितीन मगर (वय २६) व रणजित राजेंद्र मगर (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण) अशी मृत तरुणांची नावे आहेत. शेरेवाडी (ता. माण) येथे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार जयकुमार गोरे यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यात(political news) त्यांच्यासोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो. शनिवारी सकाळी आमदार गोरे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती.

याच सुमारास बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत मगर व रणजित मगर हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे निघाले होते. आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव कारने दुचाकीला उडवले. घटनेमुळे बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले. यात दुचाकीचा चक्काचूर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यात कारचेही मोठे नुकसान झाले. गंभीर दुचाकीस्वारांना तत्काळ दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा:

कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली…

सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी

नोकरीची मोठी संधी, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदासाठी निघालीये भरती