भाजप आमदार योगेश्वर यांना मुलीनेच दिली धमकी..

कर्नाटकमध्ये भाजप आमदारासमोर मुलीनेच आव्हान (challenge) उभे केले आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सी. पी. योगेश्वर यांच्या मुलींने त्यांना पक्षासमोर पोलखोल करण्याची धमकी दिली आहे. त्यांना भेटायला गेल्यानंतर सतत मारहाण करत असल्याचा आरोप योगेश्वर यांची मुलगी निशा यांनी केली आहे.

निशा योगेश्वर यांनी सोशल मीडियात व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मला त्रास दिला तर मी अशा ठिकाणी व्हिडिओ पाठवेन जिथे तुम्हाला डोके वर करून चालता येणार नाही. सोशल मीडिया पोस्टमध्ये वडिलांचे नाव वापरू नये, अशा धमक्या मला येत आहेत. या पोस्ट हटवण्यास सांगितले जात आहे, असा दावा निशा यांनी केला आहे. निशा यांनी काही दिवसांपुर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांची भेट घेत काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. आम्हाला काहीही माहिती न देता मी दहा वर्षांची असताना ते सोडून गेले आणि नवीन कुटुंब तयार केले. माझे वडील सार्वजनिक क्षेत्रात असून चांगले वडील असल्याचे त्यांनी दाखवून दिले पाहिजे, असेही निशा म्हणाल्या आहेत

मी वडिलांच्या घरी गेल्यानंतर ते पोलिसांना बोलावतात. मी प्रश्न विचारल्यानंतर मला मारहाण केली जाते. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्या-त्यावेळी मारहाण झाली आहे. आईलाही मारहाण केली आहे, असा गंभीर आरोप निशा यांनी केला आहे. आईने यापुर्वी वडिलांच्या निवडणूक प्रचारातही सहभाग घेतला होता, असा दावाही निशा यांनी केला आहे.

मागील निवडणुकीत माझ्या आईन वडिलांचा प्रचार केला होता (challenge). पण त्यानंतरही त्यांनी आईला मारहाण केली. मला मदत करण्याबाबत विचारल्यानंतर एक रुपयाही देणार नाही, असे म्हटले. पण मी त्यांच्यावर अवलंबून नाही. जगण्यासाठी भीक माग, असे ते म्हणाले. मला कशाचीही भीती नाही. मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलं आहे. आता गमावण्यासारखं काहीच नाही, असेही निशा म्हणाल्या आहेत.

हेही वाचा :

नदीत बुडालेल्या तरुणांचा शोधत गेलेल्या SDRF तीन जवान शहीद; थरारक Video ही आला समोर

‘पोलीस महानालायक असतात’,अभिनेत्री केतकी चितळेचा अपघातावर व्हिडीओ व्हायरल !

गृहिणींचे बजेट बिघडणार, मेथी, कोंथिबीर महागली, एका जुडीचा दर तब्बल…