विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षाने ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार(leaders) प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी आमदार(leaders) सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कर्नाटक, तेलंगणा आणि झारखंडमध्ये विजय कसा झाला? तसेच वायनाडच्या ताईंनी देखील राजीनामा द्यावा. कारण जिंकायचं ईव्हीएमवर आणि दोष देखील ईव्हीएमलाचं देयचा.
याशिवाय 1988 साली राजीव गांधींनी कायदा पारीत केला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने चॅलेंज दिल्यानंतर देखील कॉंग्रेसने का काही केल नाही? असं सुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. याशिवाय महाराष्ट्र विधानसभेसोबतच वायनाडची लोकसभेची पोट निवडणूक देखील झाली होती. यावरून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.
सध्या राज्यात महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात वक्फ बोर्डाने शेकडो एकर जमिनीवर दावा केल्याने तणावपूर्ण वातावरण आहे. यावर देखील मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे शरद पवार, उध्दव ठाकरेंना विनंती आहे. आपण एकत्रित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून सीमेचा वाद सोडून घेऊ, तसेच ज्या गावांवर वक्फ बोर्डाचा दावा आहे ते सोडवून घेऊ.
कारण 1956 मध्ये पंडीत नेहरूंच्या चुकीमुळे कर्नाटक सीमावाद पेटला असल्याचं म्हंटल आहे. याशिवाय बेळगाव प्रश्नच कॉंग्रेसने जन्माला घातला आहे. त्यामुळे आता मराठी माणसांवर कॉंग्रेस अन्याय करत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे नवा डाव टाकणार?…
नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं की…Video
विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत उभी फूट? ‘ही’ बाब ठरतीये चर्चेचं कारण…