भाजपचा उद्धव ठाकरेंना दे धक्का, ‘या’ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका जवळ आल्या असतानाच भाजपने(political news) शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का दिला आहे. जळगावच्या एरंडोलमधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ठाकरे(political news) गटाच्या तीन माजी नगराध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश
दशरथ महाजन – ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख

किशोर निंबाळकर – माजी नगराध्यक्ष

राजेंद्र चौधरी – माजी नगराध्यक्ष

भगवान महाजन – अपक्ष नेते

इतर पदाधिकारी आणि माजी नगरसेवक

या पक्षप्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) कमकुवत होत चालली आहे, तर भाजपचा प्रभाव वाढत आहे. विधानसभेनंतर ठाकरे गटातील अनेक प्रमुख नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही याचा मोठा परिणाम होणार आहे.

शिवसेना (शिंदे गट) सध्या राज्यभर “ऑपरेशन टायगर” राबवत असून, उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. कालच, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, मुंबईतील तीन माजी नगरसेवक आणि अनेक शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश झाला.

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर आणि गंगापूर मतदारसंघात आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश मोठ्या राजकीय घडामोडींचा भाग मानले जात आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांचे भाजप आणि शिंदे गटात प्रवेश सुरूच राहिल्यास, आगामी निवडणुकीत मोठे परिणाम दिसून येऊ शकतात.

हेही वाचा :

प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा दणका

राज्यातील बसस्थानकांबाबत मोठा निर्णय…

जिओची भन्नाट ऑफर! IPL 2025 फुकटात पाहता येणार