भाजपच “कागल” च राजकारण घाटगेंच्या बदल्यात घाटगे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात(politics) राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे असलेल्या कागल मधील समरजीत सिंह घाटगे हे महत्त्वाचे कार्ड भाजपच्या हातातून निसटून गेले. त्यांची पुन्हा घर वापसी होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर संजय घाटगे आणि त्यांचे पुत्र अंबरीश घाटगे यांच्या हातात मुंबई मुक्कामी”कमळ”देण्यात आले आहे.

भविष्यात म्हणजे आणखी साडेचार वर्षानंतर भाजपला राज्यात एक हाती सत्ता आणावयाची आहे. आईनवेळी उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव नको म्हणून भाजपचे नेते आत्तापासूनच पूर्वतयारीला लागलेले दिसतात. त्याचाच एक भाग म्हणून घाटगे पिता-पुत्राच्या भाजप प्रवेशाकडे पाहिले जात असले तरी राजकीय फायद्याचं गणित भाजपसाठी भविष्यात इथे सुटेलच असे नाही.

संजय घाटगे यांनी अविभाजित शिवसेनेकडून कागल विधानसभेची पोट निवडणूक लढवली होती. त्यांनी हसन मुश्रीफ यांचा खळबळजनक पराभव केला होता. आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवले आणि हातामध्ये “हात” घेऊन ते काँग्रेसवासी झाले. काँग्रेसची(politics) जिल्हा अध्यक्ष पदाची निवडणूक ही लढवून त्यांनी कल्लाप्पांना आवाडे यांच्यासारख्या वजनदार नेत्याचा पराभव केला होता. तेव्हा स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीत मोठा राडा झाला होता. दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती.

नंतर काँग्रेस श्रेष्ठींनी संजय घाटगे यांच्या निवडीला स्थगिती दिली होती. त्यामुळे संजय घटके हे निवडून आल्याच्या घोषणेपर्यंतच काही तासांचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बनले होते. त्यानंतर ते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेले. तेथेही त्यांचा जीव रमला नाही. म्हणून गेल्या वर्षी ठाकरे गटाच्या सेनेत दाखल झाले. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी अचानक अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर करून ठाकरे गटाला चकित केले होते.

धनुष्यबाण, हात, शिट्टी, मशाल असा हा त्यांचा राजकीय प्रवास कमळापाशी येऊन थांबला आहे. कागल क्या राजकारणात त्यांना पुत्र अमरीश घाटगे यांना लाँच करावयाचे आहे. आणि म्हणूनच त्यांनी भाजप हा मजबूत पर्याय निवडला आहे. कागल चा राजकारणात(politics) हसन मुश्रीफ, समरजीत सिंह घाटगे आणि संजय मंडलिक हे तीन प्रमुख प्रभावी गट आहेत. या गटांच्या तुलनेत संजय घाटगे गट फारसा प्रभावी नाही पण या गटाचे राजकीय उपद्रव मूल्य या मतदारसंघात निश्चित आहे.

इसवी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकी पर्यंत या गटाला सर्व प्रकारची प्रसाद देऊन प्रबळ करावे लागणार आहे. पण हा एकमेव विधानसभा मतदारसंघ असा आहे की इथे राजकीय पक्षापेक्षा गटाला अधिक महत्त्व आहे. आणि या मतदारसंघातला प्रत्येक गट व्यक्ती केंद्रित आहे. भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखवण्याची संधी इथे मिळालेली नाही. जेव्हा भाजप हा बाल्यावस्थेत होता तेव्हा भाजप उमेदवाराला आपलं डिपॉझिट राखता आलेला नाही.

संजय घाटगे गटाची या मतदारसंघात ताकद वाढवण्याचे काम भाजपला करावे लागेल. 2019 पासून या मतदारसंघाचा भाजपने समरजीत सिंह घाटगे यांना ताकद देण्याचे काम केले होते. पण महाराष्ट्राचे राजकारण बदलले आणि भारतीय जनता पक्षाला हा मतदारसंघ अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांच्यासाठी सोडावा लागला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीनेच एकत्र लढायचे ठरवले तर कागल मतदारसंघ हा पुन्हा मुश्रीफ यांच्यासाठी सोडावा लागेल. तेव्हा संजय घाटगे यांचीच मोठी अडचण होणार आहे.

हेही वाचा :

धावत्या इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकत होता हात…

धक्कादायक! २ अल्पवयीन मुलींवर नराधमांकडून अत्याचार

राज्यात आणखी एक आघाडी विरोधी पक्षाची कमतरता दूर करण्यासाठी तीन बडे नेते एकत्र