मुंबई आमदारांची बैठकीत BJP च्या मराठा आमदारांची कानउघाडणी

मुंबईत भाजपच्या मराठा आमदारांची (member) बैठक पार पडली आहे. या बैठकीत भाजपचे विधानसभा आणि विधान परिषदेचे फक्त मराठा आमदार उपस्थित होते. बैठकी मराठा आमदारांची कानउघाडी करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सरकारने केलेली कामे मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यास मराठा आमदार अयशस्वी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मराठा समाजासाठीची कामे मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यात अपयश, असल्याचं बैठकीत बोललं गेलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीला रवींद्र चव्हाण, प्रविण दरेकर, सुरेश धस, राणा जगजिसिंह, प्रसाद लाड आणि खासदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे आमदार उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा समाजासाठी केलेलं काम समाजापर्यंत पोचवण्यात मराठा आमदार अयशस्वी झाल्याचं बोललं गेलं आहे. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला दिलेला निधी या सगळ्या गोष्टी पोचवण्यात मराठा आमदार मागे राहिल्याचं सांगण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसू नये यासाठी मराठा आमदारांच्या बचावात्मक पवित्र्याचा भाजपला बसला आहे. या सगळ्याच्या अनुषंगाने आमदारांची कानउघाडणी करण्यात आली आहे.

भाजपच्या मराठा आमदारांसोबत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली आहे. मराठा समाजाच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी बैठकीत चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात फटका बसला होता.

हेही वाचा :

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना EPFO चा धक्का, ही महत्वाची सुविधा बंद

कोल्हापूरात १८ जूनला मोर्चा! तर २७ जूनला……

सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?