लोकसभा निवडणुकीत(election) भाजपला झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांना आपल्या तंबूत सामील करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
याच संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे नेते चंपाई सोरेन भाजपमध्ये सामील होणार आहेत. या निर्णयाबाबतची माहिती सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या दरम्यान मिळाली.
चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश 30 ऑगस्ट रोजी रांची येथे होणार आहे. या घटनेची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून दिली आहे. सरमांनी दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत चंपाई सोरेन यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच चंपाई सोरेन यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. परंतु, भाजपमध्ये सामील होण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंपाई सोरेन यांच्या विधानसभेतील महत्त्वपूर्ण स्थानामुळे भाजपला आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
हेही वाचा:
कोल्हापूरमध्ये सर्वात मोठी दहीहंडी – लाखो रुपयांचे बक्षीस
बनवा चटपटीत,चटकदार आगळी-वेगळी अशी कुरडईची भाजी