लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी(political marketing) आज (५ ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं.
मात्र, राहुल गांधींच्या या दौऱ्याला भाजपाकडून(political marketing) जोरदार विरोध होत असल्याचं पाहायला मिळल. भाजपा कार्यकर्त्यांनी आज राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या जवळच अडवले. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.
आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अमेरिकेत आरक्षणाविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी यांचं आगमन होण्यापूर्वीच पोलिसांनी भाजपा कार्यालयातच कार्यकर्त्यांना घेरलं.
राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आगमन होताच ते उचगाव येथे कार्यकर्त्याच्या घरी भेटीला गेले. परंतु, दुसऱ्या बाजूला राहुल यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा कार्यकर्ते नगाळा पार्क येथील त्यांच्या कार्यालयात निषेध करण्यासाठी एकत्र जमा झाले. त्यानंतर ते ताराराणी चौकाकडे रवाना झाले.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. मात्र, कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडं धावले. यावेळी पोलिसांनी अडवल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं.
यावेळी राहुल गांधींविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान भाजपा वरिष्ठांनी जिल्हाध्यक्षांना फोन करून आंदोलन स्थगित करण्यास सांगितल्यानंतर सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आले.
हेही वाचा:
श्री अंबाबाईची विजयादशमी निम्मित रथारूढ पूजा
कोल्हापुरातील वारं राहुल गांधींनी फिरवलं; टेम्पो चालकाच्या घरी स्वतः झाले ‘कुक’
तरूण बाईकवर स्टंट करत कूल बनण्याचा करत होता प्रयत्न अन्… Video