21 शेळ्या, 3 म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि 5 डुकरांचा बळी! काँग्रेस सरकार पाडण्यासाठी ‘ब्लॅक मॅजिक’

कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर(government) पुन्हा संकट येऊ घातल्याचे संकेत मिळू लागले आहे. ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून आमदार फोडत राज्यातील सरकारला भाजपने पाडले होते. याची आठवण ताजी असतानाच आता पक्षातील नेत्यांना जादूटोण्याची भीती सतावू लागली आहे.

काँग्रेस सरकार(government) पाडण्यासाठी जादुटोणा केला जात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. केरळमध्ये एका मंदिरात शत्रू भैरवी यज्ञ सुरू आहे. त्यामध्ये एकवीस शेळ्या, तीन म्हशी, 21 काळ्या मेंढ्या आणि पाच डुकरांचा बळी देण्यात आल्याचादावा शिवकुमारांनी केला आहे.

शिवकुमार यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी कर्नाटकमधील काही नेत्यांचा यामध्ये हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कामासाठी काही अघोरी कृत्य करणाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून शिवकुमार यांच्या हाताता एक ब्रेसलेट दिसत आहे.

ब्रेसलेटविषयी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी जादुटोण्याचा खुलासा केला. केरळमध्ये माझ्या आणि आमच्या सरकारविरोधात मोठा प्रयोग सुरू आहे. मला याबाबत एकाने लेखी कळवले आहे. ही पुजा कुठे होत आहे, कोण करत आहे, हे मला समजल्याचा दावा शिवकुमारांनी केला आहे.

केरळमधील राजराजेश्वरी मंदिराजवळ यज्ञ सुरू आहे. अशा यज्ञांवर विश्वास आहे का, हे विचारल्यानंतर शिवकुमार यांनी हे व्यक्तीच्या श्रध्देवर अवलंवून असल्याचे सांगितले. माझ्याविरोधात त्यांना कसलेही प्रयोग करू देत. माझ्या एका शक्तीवर विश्वास आहे, तीच शक्ती मला वाचवेल, असे शिवकुमार म्हणाले.

शिवकुमार यांनी हा दावा करताना कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्यांचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांनी हे कोण करू शकते, हे तुम्हालाही माहिती आहे, असे म्हणत माध्यमांनाच उलट प्रश्न केला. हे करणारे राजकीय नेते नाहीत, तर मग कोण करणार, असे सुचक विधानही त्यांनी केले.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा

लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये…; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?

मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा  कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरो