शारीरिक संबंध अन् व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; काँग्रेसच्या नेत्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या (Blackmailed)काही तासांमध्ये काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येचा तपास करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ३६ तासांच्या आत बहादुरगड येथील रहिवासी सचिन याला अटक केली. आरोपीकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले असून तो मोबाईलच्या दुकानाचा मालक आहे. पोलीस चौकशीतून हे स्पष्ट झालं की, हिमानी आणि सचिन हे रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी आरोपीकडून हिमानीचे दागिने आणि फोनही जप्त केलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन आणि हिमानी एकमेकांना एक ते दीड वर्षांपासून ओळखत होते. सचिन हिमानीच्या घरी नेहमी येत जात राहायचा. बऱ्याचदा तो तिथे मुक्कामासाठी देखील (Blackmailed)राहिल आहे. सचिनचे अगोदरच लग्न झाले होते आणि दोन मुलांचा तो बाप आहे. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक हिमानीचा मृतदेह बस स्टँडवर एका बॅगमध्ये आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

सचिन आणि हिमानी यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. तिने सचिनला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्यांचे शारीरिक संबंध निर्माण झाले. धक्कादायक बाब म्हणजे, याचा व्हिडीओ हिमानी हिने बनवला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून ती सचिनला ब्लॅकमेल करत होती. तीन लाखांपेक्षा (Blackmailed)जास्त रक्कम सचिनने हिमानीला दिली होती. ती आपल्यावर पैशांसाठी सतत दबाव टाकत असल्याचे पोलिसांना सचिनने सांगितलं आहे.

हेही वाचा :

‘पंकजा मुंडे माझ्या नवऱ्यामुळेच मंत्री बनू शकल्या’; करूणा शर्मांचं वक्तव्य चर्चेत

‘हॅप्पी हार्मोन्स’ कसे वाढवावेत?; जाणून घ्या सोपे मार्ग

खळबळजनक! प्रेमीयुगुलाची वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या