पुणे : पुण्यातील स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्तात्रेय गाडेची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन(court) कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती, ज्याची मुदत संपल्यानंतर बुधवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपी गाडेवर भारतीय न्याय(court) संहितेनुसार कलम ६४ (२)(M), ११५ (२) आणि १२७ (२) या तीन अतिरिक्त कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. तपासादरम्यान, आरोपीने पीडित तरुणीवर दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांमुळे आरोपीला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला गुन्हा घडलेल्या स्वारगेट बस डेपो परिसरात आणि त्याच्या मूळ गावी गुनाट येथे नेले. त्याने गुन्हा घडल्यानंतर ज्या शेतात लपून बसला होता, त्याची तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
तपासादरम्यान, आरोपीचे वीर्य, रक्त, नखं आणि केस यांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले गेले आहेत. तसेच, आरोपी आणि पीडित तरुणीची डीएनए चाचणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. पीडितेची वैद्यकीय चाचणी झाली असून, तिचा अंतिम अहवाल अद्याप न्यायालयात सादर झालेला नाही.
पोलिसांनी गाडेच्या घराची झडती घेतली असली, तरी गुन्ह्याच्या वेळी वापरलेला मोबाइल अद्याप सापडलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत असून, मोबाइलमध्ये गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :
ठाकरे गटाला धक्का ! ‘या’ फायरब्रँड महिला नेत्याचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
परीक्षेसाठी पत्नी बाहेरगावी गेल्यावर पतीने मेव्हणीसोबत केलं लग्न; नंतर बायकोला व्हिडिओ कॉल केला अन्…