रक्तरंजित रविवार! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

भोपाळ- इंदौरमध्ये भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मोनू कल्याणे यांची गोळी घालून हत्या(latest political news) करण्यात आली आहे. मोनू मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं.

इंदौर शहरात रविवारी एमडी रोड पोलीस स्टेशन(latest political news) क्षेत्रामध्ये चिमनबाग येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून पीयूष आणि अर्जुन यांनी मोनू कल्याणे यांना संपवलं आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

इंदौर विधानसभा क्रमांक ०३ मध्ये मोनू कल्याणेचा प्रभाव होता. कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आणि माजी आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या ते जवळचे होते. गोळी लागल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनू कल्याणे शनिवारी रात्री उशिरा भगवा यात्रेची तयारी करत होते. याचवेळी पीयूष आणि अर्जुन नावाचे दोन तरूण दुचाकीवर त्याठिकाणी आले होते. त्यांनी सुरुवातीला मोनू कल्याणेसोबत काही चर्चा केली. त्यानंतर अचानक दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अर्जनने गोळीबार सुरु केला. त्यानंतर पीयूष आणि अर्जून त्याठिकाणाहून पसार आले.

माहितीनुसार, आरोपींनी मोणू कल्याणेच्या मित्रांवर देखील गोळीबार केला आहे. सुदैवाने कोणत्याही मित्राला दुखापत झालेली नाही. मोनू कल्याणे यांच्या मृत्यूनंतर इंदौर ३ चे माजी आमदार आकाश विजयवर्गीय आपल्या समर्थकांसह मोनू कल्याणे यांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी मोनू कल्याणे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे. दरम्यान, सदर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :

भरधाव टेम्पोने झोमॅटो बॉयला फरफटत नेले, जागी झाला मृत्यू

अराजकाच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रातील जातकलह

महाराष्ट्र हादरलं! अल्पवयीन मुलीवर बापासह, चुलता अन् भावाकडून लैंगिक अत्याचार