प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; रेस्क्यू ऑपरेशन सुरू Video Viral

वाराणसी: वाराणसीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. वाराणसी येथील गंगा नदीत मान मंदिरासमोर प्रवाशांनी एक भरलेली बोट(Boat) बुडाली आहे. बोट बुडल्याचे कळताच एनडीआरएफ आणि बचाव पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफने सर्व प्रवाशांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी आणले आहे. बोटीत अनेक प्रवासी होते अशी माहिती काशीचे डिसीपी जोन बन्सवाल यांनी दिली.

गंगा नदीवरील एका घाटावर एक मोठी बोट(Boat) लहान बोटीला धडकली. या धडकेमुळे लहान बोट अनियंत्रित झाली आहे ती बोट पाण्यात उलटली. मात्र पोलिस आणि एनडीआरएफ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने जीवितहानी टळली. सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले असल्याने सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. मोठ्या बोटीत 58 प्रवासी होते. तर लहान बोटीत 6 प्रवासी होते.

प्रयागराज महाकुंभ सुरू आहे. काल त्या ठिकाणी सेक्टर 22 मध्ये भीषण आग लागली होती. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. सेया भीषण आगीत अनेक तंबू जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला होता.

महाकुंभ परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-१९ कॅम्पमध्ये भीषण आग लागली असून काही तंबू जळून खाक झाल्याचं सांगितलं जात होते. स्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. तथापि, या दाव्याला अद्याप अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते.

हेही वाचा :

Apple Watch चाहत्यांसाठी मोठी संधी; इथे मिळतोय सर्वात बंपर डिस्काउंट

‘ऑपरेशन टायगर’ होणारच…; महायुतीच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

…तर आधारकार्डच केले जाणार ब्लॉक; कृषी आयुक्तालयाद्वारे शासनाकडे प्रस्ताव