बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, एमी विर्क आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या ‘बॅड न्यूज’ ची सध्या सगळीकडे (social media) चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं आहे. गाण्यातीलव विकी कौशलच्या डान्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर(social media) या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं. अनेक लोक यावर डान्स करताना दिसत आहेत. या गाण्यावर अनेकांनी डान्स केला पण युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना सारख्या क्रिकेटपटूंनी देखील त्यावर डान्स केला आहे. मात्र, त्यांचा डान्स पाहुन तुम्हालाही हसू अनावर होईल.
वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लेजेंडचा खिताब भारतानं आपल्या नावी केला आहे. ज्यात सगळ्या देशांमधील लेजेंड क्रिकेटर्स खेळताना दिसले. पाकिस्तान आणि भारतामध्ये फायनल होत. भारतीय टीमनं चांगली कामगिरी केली होती. आता ते सगळे तरुण राहिले नाहीत त्यामुळे मॅचनंतर त्यांची अवस्था काय झाली याची माहिती त्यांनी विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ या गाण्यातून दिली आहे.
भारतीय क्रिकेटपटू आणि दिग्गज खेळाडू युवराज, हरभजन आणि सुरेश रैना यांच्यासोबत गुरकीरत सिंग देखील या व्हिडीओत आहे. तौबा तौबा गाण्याचं त्यांचं व्हर्जन त्यांनी शेअर केलं आहे. हरभजन सिंगनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं की ‘बॉडीचं तौबा तौबा झालं, 15 दिवसांपासून लेजेंड्स क्रिकेटमध्ये शरिराचे सगळे भाग हे आता दु:खत आहेत. आता थेट स्पर्धा ही विकी कौशल आणि करन आहूजाशी, आमचं तौबा तौबा व्हर्जनचा आमचं डान्स व्हर्जन. काय गाणं आहे.’
त्या चौघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत विकी कौशलनं कमेंट केली की हा हा हा हा याला मी लूपमध्ये पाहातोय. एब्सल्यूटली लेजेंड्स. नेहा धूपिया कमेंट करत म्हणाला, ही तर बॅड न्यूज आहे. प्राइम व्हिडीओ कमेंट करत म्हणाले, तौबा तौबा जमलंय.
दरम्यान, बॅड न्यूज या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर विकी कौशल एमी विर्क आणि तृप्ती डिमरी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट 19 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहे.
हेही वाचा :
ना मला राजकारणाची पर्वा, ना मंत्रिपद, ना आमदारकीची, पवारांच्या भेटीचं गूढ भुजबळांनी उलगडलं
‘स्थानिक आमदार सरकारसोबत…,’ विशाळगडाच्या अतिक्रमणावरून संभाजी राजेंचा गंभीर आरोप
सर्वसामान्यांना मोठा झटका, घाऊक महागाईने गाठला १६ महिन्यांतील उच्चांक